बंद

    ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

                                                               प्रस्तावना

    जल जीवन मिशन अंतर्गत  ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबास घरगुती कार्यात्मक नळ जोडणी द्वारे विहित गुणवत्तेचे शुद्ध स्वच्छ व शाश्वत पाणी प्रति माणसी किमान 55 लिटर प्रति दिन या प्रमाणात उपलब्ध करून देणे हा जल जीवन मिशन चा मुख्य उद्देश आहे

    याअंतर्गत प्रत्येक ग्रामीण व्यक्तीस, स्वयंपाकासाठी आणि घरगुती वापरासाठी शुद्ध व पुरेसा पाणी शाश्वत पाणी पुरवठा सर्वकाळ आणि सर्व परिस्थितीत ग्रामस्थांच्या सोयीच्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून देणे  यामध्ये फक्त योजना पूर्ण करणे एवढाच उद्देश नसून कार्यक्षम पाणीपुरवठ्याची एक शाश्वत सेवा उपलब्ध करून देणेआहे

    जलजीवन मिशन अंतर्गत 20 पेक्षा जास्त कुटुंब असलेल्या वसाहती मध्ये प्रतिव्यक्ती 55 लिटर प्रतिदिन प्रमाणे पाणी पुरवण्यात येणार आहे  अंगणवाडी केंद्र व शाळांना नळाद्वारे शाश्वत व  शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

    रचना

    रचना पाणी पुरवठा

    मुख्यालयातील मंजूर पदे

    शासन निर्णय क्र. जिपआ-2016/प्र.क्र.23 दिनांक 28.12.2022

    अ.क्र. तपशील मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे शेरा
    1 कार्यकारी अभियंता 01 01 00 शासनाचे पद
    2 उपकार्यकारी अभियंता 01 01 00 शासनाचे पद
    3 सहायक भूवैज्ञानिक 01 01 00 शासनाचे पद
    4 कनिष्ठ भूवैज्ञानिक 02 00 02 शासनाचे पद
    5 सहायक प्रशासन अधिकारी 01 01 00 जि.प चे पद
    6 सहायक लेखाधिकारी 01 01 00 जि.प चे पद
    7 कनिष्ठ अभियंता (स्था) 04 03 01 जि.प चे पद
    8 वरिष्ठ सहायक लेखा 01 01 00 जि.प चे पद
    9 कनिष्ठ सहायक 05 05 00 जि.प चे पद
    10 परिचर 05 04 01 जि.प चे पद
    एकूण 22 18 04

    योजना व उपक्रम

    जल जीवन मिशन संक्षिप्त टिप्पणी

    मा. पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट 2019 रोजी देशातील प्रत्येक कुटूंबास 2024 पर्यंत “हर घर नल से जल” उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. या साठी, केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सन 2024 पर्यंत (2023-24 वर्ष) देशातील सर्व घरांना घरघुती नळ जोडणी देणे (FHTC) Functional House Hold Tap Connection, पाणी पुरवठा करावयाचा आहे.

    या करीता केंद्र शासनाने सन 2009-10 पासून सुरू असलेला, केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम जल जीवन मिशनमध्ये समाविष्ट करून, पुर्नरचना करण्याचे ठरविले आहे. या नुसार ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन 2024 पर्यंत “हर घर नल से जल” (FHTC) प्रमाणे पाणी पुरवठा करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे व यास जल जीवन मिशन हे नाव दिले आहे.

    या करीता, महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग शासन निर्णय क्र. जजमि 2019/प्र.क्र.138/पापु-10(07) दिनांक 04 सप्टेंबर 2020 शासन निर्णया नुसार जल जीवन मिशन राबविणे बाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

    उद्दिष्ट

    • जल जीवन मिशन अंतर्गत, सन 2024 पर्यंत राज्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबास घरगुती कार्यात्मक नळ जोडणीव्दारे विहित गुणवत्तेचे (शुद्ध, स्वच्छ व शाश्वत) पाणी प्रती माणसी किमान 55 लि. प्रति दिन या प्रमाणात उपलब्ध करून देणे हा जल जीवन मिशनचा मुख्य उद्देश आहे.
    • प्रत्येक ग्रामीण व्यक्तीस, स्वयंपाकासाठी आणि घरगुती वापरासाठी शुद्ध व पुरेसा आणि शाश्वत पाणी पुरवठा सर्वकाळ आणि सर्व परिस्थितीत ग्रामस्थाच्या सोयीच्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून देणे हे उद्दिष्ट आहे.
    • फक्त योजना पूर्ण करणे एवढाच उद्देश नसून कार्यक्षम पाणी पुरवठयाची एक शाश्वत सेवा उपलब्ध करणे हा त्यामधील प्रमुख गाभा आहे.
    • 20 पेक्षा जास्त कुटुंब असलेल्या वसाहतीस, प्रति व्यक्ती किमान 55 लि. प्रति दिन प्रमाणे पाणी पुरविण्यात येणार आहे.

     

    मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांचे आदेश क्र. जा.क्र.जिपऔ /साप्रवी/10- प्रशासन/5872 दिनांक 02/12/2013 अन्वये ग्रामीण पाणी पुरवठा विभागाअंतर्गत नियुक्त सहा. जन माहिती अधिकारी व जन माहिती अधिकारी पुढील प्रमाणे आहेत.

     

    माहिती अधिकारी
    अ. क्र. सहाय्यक जन माहिती अधिकारी जन माहिती अधिकारी अपिलीय अधिकारी
    1 सहायक प्रशासन अधिकारी उप कार्यकारी अभियंता (पापु) कार्यकारी अभियंता (पापु), जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर

     

     

    माहितीचा अधिकार १ ते १७ (ग्रामीण पाणी पुरवठा)

     

    माहितीचा अधिकार १ ते १७
    अ. क्र. माहितीचे स्वरूप पहा (PDF)
    1 माहितीचा अधिकार १ ते १७ (ग्रामीण पाणी पुरवठा) माहितीचा अधिकार १ ते १७ (ग्रामीण पाणी पुरवठा) (पहा)

     

     

    नागरिकांची सनद (ग्रामीण पाणी पुरवठा)

     

    नागरिकांची सनद
    अ. क्र. माहितीचे स्वरूप पहा (PDF)
    1 नागरिकांची सनद (ग्रामीण पाणी पुरवठा) नागरिकांची सनद (ग्रामीण पाणी पुरवठा) (पहा)

     

     

    विभागाचा संपर्क

     

    संपर्क
    अ. क्र. इ मेल संपर्क क्रमांक
    1 eebnaurangabad@gmail.com 0240-2330649