विभागाची प्रस्तावना
शासन निर्णय क्रमांक आढावा 20221 प्र.क्र.47/प्रशा 5 दिनांक.22 जून 2022 नुसार शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाची निर्मिती करण्यात आली आहे. या कार्यालयामार्फत विद्यार्थी लाभाच्या विविध येाजना राबविण्यात येतात. प्राथमिक शिक्षण विभागाच्या 09, माध्यमिक शिक्षण विभागाच्या 24, अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण विभागाच्या 04 व केंद्र शासनाच्या नवीन योजना 03 अशी एकूण 40 योजना राबविण्यात येणार आहेत.
शिक्षणाधिकारी (योजना) जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा उंचावणे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे व ती टिकवणे हे असून या योजनांचा फायदा प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्यांचा शैक्षणिक विकास साधण्याचा विभागाचा सदैव प्रयत्न असतो.
या विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या कल्याणाकरिता सर्वांगीण विकासाकरिता ज्या विविध योजना राबविल्या जातात त्यामध्ये गणवेश व लेखन साहित्य वाटप, उपस्थिती भत्ता, शालेय पोषण आहार योजना, प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती इत्यादी योजनांचा समावेश आहे.