विभागाची प्रस्तावना
माध्यमिक शिक्षण विभाग – महाराष्ट्र शासन
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाअंतर्गत माध्यमिक शिक्षण विभाग कार्यरत असून, हा विभाग जिल्हा परिषद अंतर्गत कार्य करतो.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या शाळा व्यवस्थापनांचे नियमन व देखरेख,
जसे की खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित तसेच CBSE व ICSE मंडळाच्या माध्यमिक शाळा,
यांचे काम शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयामार्फत केले जाते.
शाळांचे मुख्य प्रकार
- अनुदानित शाळा
- विनाअनुदानित शाळा
- कायम विनाअनुदानित शाळा
त्याचप्रमाणे, CBSE व ICSE बोर्डाच्या माध्यमिक शाळांची देखील देखरेख या विभागाद्वारे केली जाते.
शाळांचे वर्गनिहाय प्रकार
- इयत्ता 5 वी ते 10 वी
- इयत्ता 5 वी ते 12 वी
- इयत्ता 8 वी ते 10 वी
- इयत्ता 8 वी ते 12 वी
प्रमुख कार्य
- सर्व शाळांमध्ये शासनाच्या समाजाभिमुख व विद्यार्थी हिताच्या योजना प्रभावीपणे राबविणे.
- शिक्षकांची पदनिश्चिती शासन निकषांनुसार करणे.
- अनुदानित शाळांतील शिक्षकांचे वेतन वेतन पथक प्रणालीद्वारे अदा करणे.
- खाजगी, अनुदानित, विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्यित, CBSE व ICSE शाळांचे नियमन व देखरेख करणे.
प्रमुख अधिकारी
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) हे विभागप्रमुख म्हणून काम पाहतात व सर्व प्रशासकीय व आर्थिक प्रक्रिया पाहतात.
तांत्रिक प्रणालीचा वापर
- परिपत्रके, शासन निर्णय, विविध योजना यांची माहिती अधिकृत संकेतस्थळावरून पुरविली जाते.
- सेवा पुस्तिका निश्चीती, भविष्य निर्वाह निधी, वैद्यकीय देयके यांचे संगणकीकरणाद्वारे प्रशासन.