प्रस्तावना
जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबास घरगुती कार्यात्मक नळ जोडणी द्वारे विहित गुणवत्तेचे शुद्ध स्वच्छ व शाश्वत पाणी प्रति माणसी किमान 55 लिटर प्रति दिन या प्रमाणात उपलब्ध करून देणे हा जल जीवन मिशन चा मुख्य उद्देश आहे
याअंतर्गत प्रत्येक ग्रामीण व्यक्तीस, स्वयंपाकासाठी आणि घरगुती वापरासाठी शुद्ध व पुरेसा पाणी शाश्वत पाणी पुरवठा सर्वकाळ आणि सर्व परिस्थितीत ग्रामस्थांच्या सोयीच्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून देणे यामध्ये फक्त योजना पूर्ण करणे एवढाच उद्देश नसून कार्यक्षम पाणीपुरवठ्याची एक शाश्वत सेवा उपलब्ध करून देणेआहे
जलजीवन मिशन अंतर्गत 20 पेक्षा जास्त कुटुंब असलेल्या वसाहती मध्ये प्रतिव्यक्ती 55 लिटर प्रतिदिन प्रमाणे पाणी पुरवण्यात येणार आहे अंगणवाडी केंद्र व शाळांना नळाद्वारे शाश्वत व शुद्ध पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.