ई-शासन
ई-गव्हर्नंसच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेने कार्यालयीन स्तरावर विविध उपाय योजना केल्या असून मध्यवर्ती माहिती व तंत्रज्ञान कक्ष निर्माण करण्यात आला आहे. शासनाच्या ई-गव्हर्नंस धोरणानुसार कार्यालयात खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
जि. प. चे संकेतस्थळ
जिल्हा परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ https://chhatrapatisambhajinagarzp.maharashtra.gov.in/ हे आहे. ई-गव्हर्नंस धोरणानुसार gov[dot]in चे डोमेन नेम एनआयसी कडून प्राप्त करण्यात आले आहे.
जि. प. चे अधिकाऱ्यांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी [at]gov[dot]in चे ई-मेल प्राप्त करून घेण्यात आले आहेत.
ब्रॉडबँड इंटरनेट व लॅन
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद मुख्यालायातील सर्व संगणक लॅनव्दारे जोडले असून सर्व संगणकांना इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व पंचायत समिती कार्यालयतील संगणक लॅन व ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन ने जोडले असून त्याव्दारे ई-मेल, बीडीएस इत्यादी साठी वापर केला जातो. सध्या वाय-फाय प्रणाली उपलब्ध करून देण्याचे कार्य सुरु आहे.
ग्रामीण हजेरी अँप
कर्मचार्यांनी कार्यालयीन वेळेत कामावर हजर राहण्यासाठी जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर येथे आणि जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्या, आरोग्य केंद्र, उपविभाग ई. मह्त्वाच्या सर्व ठिकाणीग्रामीण हजेरी अँप प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. कर्मचार्यांना फोटो काढून live Location नुसार दैनंदिन हजेरी नोंदविली जाते. कर्मचार्याच्या येण्याच्या व जाण्याच्या वेळेची नोंद या प्रणालीद्वारे होते.
इ – ऑफिस
जिल्हा परिषद मधील सर्व विभाग आणि सर्व पंचायत समिती येथील सर्व कर्मचाऱ्यांचे [at]gov[dot]in चे ई-मेल प्राप्त करून घेण्यात आले असून दैनंदिन कार्यालयीन पत्रव्यवहार इ – ऑफिस मार्फत करण्यात येतो.
व्हिडियो कॉन्फरसिंग
०५ जानेवारी २०१३ पासून जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथे स्वतंत्र व्हिडियो कॉन्फरसिंग कक्षाची स्थापना करण्यात आली असुन जिल्हा परिषदचे सर्व अधिकारी त्याद्वारे शासनाशी थेट सम्पर्कात असतात. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर हे कामांचा आढावा नियमीतपणे घेत आहेत.
सीसीटीव्ही कॅमेरे
जिल्हा परिषदेतील अधिकारी / कर्मचारी यांच्या कामकाजावर नियंत्रण असणे आवश्यक असते. यामुळे जिल्हा परिषदेतील सर्व विभागात सीसीटीव्ही कॅमेरा प्रणाली अंमलात आणली आहे. या कॅमेरांचे थेट प्रक्षेपण मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) यांच्या दालनातील संगणकावर व टीव्हिवर होते.
युनिकोड फॉन्ट
म. एस. वर्ड, एम. एस. एक्सेल, इ. फाईलवर जि. प. चे कार्यालयातील कोणत्याही संगणकावर काम करता येणेसाठी युनिकोड फॉन्ट वापरणेवर भर देण्यात येत आहे. युनिकोड फॉन्ट साठी आधुनिक सॉफ्टवेअर्स जसे गुगल इनपुट टूल्स,आयएसएम V-6, ई. सॉफ्टवेअर्स संगणकांवर स्थापित करण्यात आले आहे.