प्रस्तावना
वित्त विभाग हा जिल्हा परिषदेमध्ये असणा-या एकूण १४ विभागांपैकी एक महत्वाचा विभाग आहे. मुख्य लेखा व वित्त अधिकारी हे या विभागाचे प्रमुख आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मान्यता आवश्यक असणा-या जिल्हा परिषदेकडील सर्व विभागांकडील योजनाविषयक /आर्थिक बाबींविषयक प्रस्ताव-प्रकरणे यांची छाननी करुन आर्थिक/लेखाविषयक अभिप्राय देवून सादर करणेचे काम या विभागामार्फत केले जाते.
वित्त विभाग हा जिल्हा परिषदेमध्ये असणा-या एकूण १४ विभागांपैकी एक महत्वाचा विभाग आहे. मुख्य लेखा व वित्त अधिकारीहे या विभागाचे प्रमुख आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांची मान्यता आवश्यक असणा-या जिल्हा परिषदेकडील सर्व विभागांकडील योजनाविषयक /आर्थिक बाबीं विषयक प्रस्ताव-प्रकरणे यांची छाननी करुन आर्थिक/लेखाविषयक अभिप्राय देवून सादर करणेचे काम या विभागामार्फत केले जाते.
वित्त विभागामधील केली जाणारी कामे
अर्थसंकल्प शाखा:
जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प तयार करणे, शासनाकडुन मंजूर झालेल्या अनुदानाचे कोषागारातून आहरण व संवितरण करणे, RTGS द्वारे वित्त प्रेषण वाटप करणे, सदर निधीचे नियोजन व खर्चावर नियंत्रण ठेवणे.
संकलन शाखा:
जिल्हा परिषदेस प्राप्त झालेल्या शासनाच्या विविध योजनांच्या अनुदानातुन विभाग/ तालुकानिहाय झालेला खर्च संकलित करुन मासिक लेखे व वार्षिक लेखे तयार करुन मा.सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने शासन राजपत्रात प्रसिध्द करणे.
निवृत्ती वेतन शाखा :
जि.प.अंतर्गत वर्ग -3 व 4 कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन/ कुटुंब निवृत्ती वेतन प्रकरणे मंजूर करणे. निवृत्ती वेतनाचे आदेश (PPO) निर्गमित करणेही कामे केली जातात. जिल्हा स्तरावर निवृत्ती वेतन कक्ष स्थापन करण्यात आला असून मुख्यालय स्तरावरुनच जिल्हयातील जि.प.निवृत्ती वेतनधारक /कुटुंब निवृत्ती वेतनधारकांचे निवृत्ती वेतन R.T.G.S द्वारे थेट बँक खात्यावर जमा करण्यात येत आहे. सदर शाखेचे संनियत्रण अधिकारी उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी हे आहेत.
पुर्व लेखा परिक्षण शाखा -1/2/3 :
जिल्हा परिषदेच्या विविध विभागाकडील वित्तीय बाबीविषयक प्राप्त संचिकेवर अभिप्राय देवून मान्यतेस्तव सादर करणे, तसेच प्राप्त देयके पारित करुन रक्कम संबंधिताचे खात्यावर RTGS / ZPFMS /LRS द्वारे Online Payment संबंधित एजन्सीच्या बँक खात्यावर जमा करणे ही कामे केली जातात.
भविष्य निर्वाह निधी शाखा :
जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग -3 व वर्ग – 4 कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीची प्राप्त प्रकरणे जसे भ.नि.नि.अंतिम प्रस्ताव, परतावा/ना-परतावा व इतर अनुषंगिक प्रकरणे मंजूर करणे, कर्मचाऱ्यांचे स्लिप वाटप करणे तसेच भ.नि.नि.ची देयके कोषागार कार्यालयात सादर करुन रक्कम RTGS द्वारे संबंधिताच्या खात्यावर जमा करणे. भ.नि.नि. वार्षिक खाते उतारा तयार करुन संबंधितास कार्यालय प्रमुखामार्फत अदा करणेही कामे केली जातात. सदर शाखेचे नियंत्रण अधिकारी उपमु.ले.ववि.अ. आहेत.
अधिकारी व कर्मचारी यांची भविष्य निर्वाह निधी (Slip) Online काढण्यासाठी येथे क्लिक करा
भविष्य निर्वाह निधी (Slip)