बंद

    समाज कल्याण विभाग

    प्रस्तावना

    भारतीय संविधानात कलम ४६ नुसार राज्य हे दुर्बलतर जनवर्ग आणि विशेषतः अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांची विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हित संवर्धन करील आणि सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यांपासून यांचे संरक्षण करील यास अनुसरून महाराष्ट्र राज्याने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती यांच्या कल्याणार्थ विविध योजना सुरू केलेल्या आहेत. या योजनांची अंमलबजावणी समाज कल्याण विभागामार्फत करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासन, समाज कल्याण सांस्कृतिक कार्य व क्रिडा विभाग, शासन निर्णय क्र. बीजीटी-२०००/प्र.क्र./१५५/अर्थसंकल्प दिनांक ४ नोव्हेंबर २००० अन्वये महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम १९६१ च्या कलम १०० खाली ६ योजना व कलम १२३ खाली २ योजना समाज कल्याण विभागातील एकूण ८ योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत करण्यात आलेल्या आहेत. सर्व मागासवर्गीय व दुर्बल घटकांना सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेत आणून त्यांचा शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी निरनिराळ्या योजना समाज कल्याण तसेच इतर यंत्रणेमार्फत राबविल्या जातात.

    रचना

    रचना समाजकल्याण

     

    अ. क्र. तपशील तपशील भरलेली पदे रिक्त पदे
    १. जिल्हा समाज कल्याण अधिकारी ०१ अतिरिक्त कार्यभार ०१
    २. कार्यालयीन अधिक्षक ०१ ०१ ००
    ३. कनिष्ठ प्रशासन अधिकारी ०१ ०० ०१
    ४. सहाय्यक लेखा अधिकारी ०१ ०१ ००
    ५. वैद्यकीय सामा. कार्यकर्ता ०१ ०० ०१
    ६. समाज कल्याण निरीक्षक ०५ ०२ ०3
    ७. सहाय्यक सल्लागार ०१ ०० ०१
    ८. वरीष्ठ लिपीक ०२ ०२ ००
    ९. कनिष्ठ सहाय्यक लेखा ०१ ०१ ००
    १०. कनिष्ठ लिपीक ०१ ०१ ००
    ११. वाहन चालक ०१ ०० ०१
    १२. परिचर ०३ ०० ०३
    एकूण १९ ११

    योजना व उपक्रम

    • समाज कल्याण विभागाच्या विविध योजना

    अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे 

    अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे या योजनेअंतर्गत  अनुज्ञेय असलेल्या अनुदानात शासन निर्णय क्रमांक-संकीर्ण-2021/प्र.क्र.79/अजाक दिनांक-06.10.2021 अन्वये खालीलप्रमाणे वाढ करण्यात आली आहे

    अ.क्र. लोकसंख्या अनुदान रुपये (लाखात)
    1. 10 ते 25 4.00
    2. 26 ते 50 10.00
    3. 51 ते 100 16.00
    4. 101 ते 150 24.00
    5. 151 ते 300 30.00
    6. 300 च्या पुढे 40.00

    अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे या योजनेअंतर्गत करण्यात येणारी कामे

    शासन निर्णय क्रमांक दवसू-2011/प्र.क्र.442/अजाक दिनांक 05.12.2011 व दिनांक 13.12.2021 úनुसार अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमध्ये कामे हाती घेताना ती पुढील प्राधान्यक्रमाने हाती घेण्यात यावीत.

    1. पाणी पुरवठा 2. मलनि:स्सारण 3. पोहोच रस्ते  4. अंतर्गत रस्ते  5. विजपुरवठा  6. समाज मंदीर  .ü7. पेव्हर ब्लॉक बसविणे

    अनुसूचित जाती वस्त्या-

    अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे या योजनेअंतर्गत सन 2023-24 ते 2027-28 या कालावधीसाठी तयार करण्यात आलेल्या बृहत आराखडयामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्हयातील एकूण अनुसूचित जातीच्या वस्त्यांची संख्या खालील तपशिलात दर्शविल्याप्रमाणे घेाषित करण्यात आलेली आहे.

    अ.क्र. पंचायत समितीचे नाव एकूण  ग्रामपंचायत संख्या नविन घोषित केलेल्या वस्त्यांची संख्या सन 2023-24 ते 2027-28 आराखडयानुसार एकूण अनुसुचित वस्त्यांच्या संख्या
    1 छत्रपती संभाजीनगर 115 53 338
    2 गंगापूर 111 33 279
    3 कन्नड 138 21 201
    4 खुलताबाद 40 4 96
    5 पैठण 110 28 290
    6 फुलंब्री 71 38 204
    7 सिल्लोड 104 40 241
    8 सोयगाव 46 4 73
    9 वैजापूर 135 27 330
    एकूण 870 248 2052

     

    अ.क्र. योजनेचे नाव योजनेचे उदिदष्ट आवश्यक कागदपत्रे
    1 अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी प्रत्येक दलित वस्त्यामध्ये पाणीपुरवठा ,गटारे, पोहोच रस्ते,अंतर्गत रस्ते ,समाजमंदीर व पथदिवे इत्यादी पायाभूत व्यवस्था करून त्यांचा सर्वांगिण विकास करणे 1.विहीत नमुन्यात अर्ज 2.ग्रामपंचायत ठराव 3. कामाचे अंदाजपत्रक  4.ज्या जागेवर काम करावयाचे आहे त्या जागेचा नकाशा व फोटो 5.मागील कामाचे उपयागिता प्रमाणपत्र
      • अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती योजना सन 2023-24 पासुन राबविण्यात येते.
        • सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना:-

        योजनेची माहिती:- प्राथमीक व माध्यमिक शाळेमध्ये अनुसूचित जातीच्या मुलीच्यागळतीचे प्रमाण कमी  व्हावे म्हणुन सदरचा उपस्थीती भत्ता अदा करण्यात येतो. या शिष्यवृत्ती मध्ये इयत्ता 5 वी ते 7 वी साठी महिना रु.60/- दहा महिन्या करिता अदा होतो तथा इयत्ता 8 वी ते 10 वी साठी महिना रु.100/- दहा महिन्या करिता अदा होतो.

        उद्देश:- मान्यता प्राप्त्‍ प्राथमीक व माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या अनुसूचित जाती जमाती विदयार्थ्यींना शिक्षणात जास्त प्रोत्साहन देणे.

        आवश्यक निकष:- 1) पालकाच्या व विद्यार्थ्याच्या आधारला मोबाईल लिंक असणे.

        • आधार लिंक बँक खाते आवश्यक.
        • संबंधित शाळेकडुन मागासवर्गीय मुलींचे  अर्ज भरण्यात येतात.

         

        1. गुणवत्ता शिष्यवृत्ती इयत्ता 5 वी ते 7 इयत्ता 8 वी ते 10 वी :-
      • योजनेची माहिती:- प्राथमीक व माध्यमिक शाळेमध्ये अनुसूचित जातीच्या मुले व मुलीना प्रोत्साहन देण्या करीता प्रथम व व्दितीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना देण्यात येतो. संबंधित शाळेकडुन मागासवर्गीय मुले व मुलींचे  अर्ज भरण्यात येतात. या शिष्यवृत्ती मध्ये इयत्ता 5 वी ते 7 वी साठी वार्षिक रु.500/- तथा इयत्ता 8 वी ते 10 वी साठी वार्षिक रु. 1000/- देण्यात येतात.उद्देश:- मान्यता प्राप्त्‍ प्राथमीक व माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या अनुसूचित जाती जमाती विदयार्थ्यींना शिक्षणात जास्त्‍ प्रोत्साहन देणे.आवश्यक निकष:- 1) पालकाच्या व विद्यार्थ्याच्या आधारला मोबाईल लिंक असणे.2) आधार लिंक बँक खाते आवश्यक.3) मागील इयतेतून मागास विद्यार्थातून प्रथम किंवा व्दितीय क्रमांकाने उत्तीर्ण आवश्यक.4) पालकाचे उत्पन्न 2 लक्ष असावे.
      • महर्षी विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण फी परीक्षा फी:-योजनेची माहिती:- इयत्ता 1 ते 10 च्या मुले व मुलीना प्रोत्साहन देण्या करीता त्याच्या पाल्यावर अधिक भार पाडु नाही करीता देण्यात येतो. संबंधित शाळेकडुन मागासवर्गीय मुला व मुलींचे अर्ज भरण्यात येतात. या शिष्यवृत्ती मध्ये इयत्ता 1 वी ते 4वी साठी वार्षिक रु.1000/- इयत्ता 5 वी ते 7 वी साठी वार्षिक रु.1500/- तथा इयत्ता 8 वी ते 10 वी साठी वार्षिक रु. 2000/- देण्यात येतात.आवश्यक निकष:- 1) पालकाच्या व विद्यार्थ्याच्या आधारला मोबाईल लिंक असणे.2) आधार लिंक बँक खाते आवश्यक.3) दारिद्रय रेषेचे प्रमाणपत्र आवश्यक.
        • अस्वच्छ व्यवसाय धोकादायक व्यवसायात करणाया पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती योजना:-
      • योजनेची माहिती:- सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अनुज्ञेय आहे. ज्या व्यक्ती अस्वच्छ व्यवसायात कामे करतात त्या व्यक्तींच्या पाल्यांना सदर शिष्यवृत्ती देण्यात येते. त्या पाल्यांना शिक्षणाबद्दलचे प्रोत्साहन वाढविण्या करिता देण्यात येते. इयत्ता 1 ली ते 10 वी मध्ये शिकणारे व वस्तीगृहात न राहणारे विदयार्थ्याना वार्षिक शिष्यवृत्ती रु.3000/- देण्यात येतात.आवश्यक निकष:- 1) पालकाच्या व विद्यार्थ्याच्या आधारला मोबाईल लिंक असणे.2) आधार लिंक बँक खाते आवश्यक.3) अस्वच्छ व्यवसाय करीत असल्याचे प्रमाणपत्र4) रु.20 च्या स्टॅम्प पेपरवर हमी पत्र.
        • इयत्ता 9 वी 10 वी मध्ये शिकत असलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती योजना:-
      • योजनेची माहिती:- अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने केंद्र शासनाने दिनांक 01 जुलै 2012 पासून इयत्ता 9 वी व 10 वी मध्ये शिकत असणा-या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी भारत सरकार मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती योजना सुरु केली आहे. वार्षिक रु.2250/- देण्यात येतात.आवश्यक निकष:- 1) पालकाच्या व विद्यार्थ्याच्या आधारला मोबाईल लिंक असणे.2) आधार लिंक बँक खाते आवश्यक.3) जातीचा दाखला.4) रहिवासी प्रमाणपत्र.5) पालकाचे उत्पन्न 2 लक्ष असावे.
    अ.क्र. योजनेचे नाव योजनेचे उद्दीष्ट योजनेच्या लाभाचे स्वरुप  /  अटी व शर्ती
    1 स्वयंसेवी  संस्था  संचलित  मागासवर्गीय  मुलामुलींचे  अनुदानित वसतिगृह योजना ( अनु. जाती /वि.जा.भ.ज.) मागासवर्गीय विदयार्थ्यांचा शैक्षणीक दर्जा सुधारणेच्या दृष्टीने  त्यांना  वसतिगृहाच्या सोयी  आणी शैक्षणीक सवलती यांचा फायदा घेण्या बाबत प्रोत्साहन देणे. 1) वसतिगृहात इयत्ता 5 ते 10 वी  च्या मागासवर्गीय विदयार्थी/विदयार्थींनीना प्रवेश देण्यात येतो.
    2) प्रवेशित निवासी  महाराष्ट्र राज्यातील  रहिवासी असावा.‍
    3) स्थानिक विदयार्थ्यांना प्रवेश देता येत नाही.  मात्र मांग, मेहतर, कातकरी, व गौंड समाजाच्या  स्थानिक विदयार्थ्यांना  आणी अनाथ दिव्यांग व निराश्रीत छात्रांना प्रवेश देता येतो.                                                  4) राज्यातील स्वयंसेवी संस्था मार्फत इयत्ता 5 वी ते 10 मध्ये शिक्षण घेणा-या  प्रवेशितांना ‍निवास, भोजनाची मोफत सोय करण्यात येते.
    5) वसतिगृहातील प्रत्येक प्रवेशितांसाठी संस्थेस दरमहा 2200/- या प्रमाणे 10  महिन्यासाठी परिपोषन अनुदान देण्यात येते.
    6) इमारत भाडयाची असल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाने   प्रमाणीत केल्यानुसार  एकूण भाडयाच्या 75 टक्के इमारत भाडे प्रदान करण्यात येते.
    7) वसतिगृहातील कर्मचा-यांना यांना मानधन अधीक्षक यांना रु.10,000/-,  स्वंयपाकी यांना रु. 8500, चौकीदार रु .7500, मदतनिस यांना रु. 7500 या प्रमाणे मासिक मानधन देण्यात येते.
    2 आंतरजातीय विवाह प्रोत्साहन पर आर्थिक सहाय्य राज्यातील  जातीयता  भेदाभेद  कमी  करण्यासाठी  जातीय  सलोखा  निर्माण करण्यासाठी  सदरची  योजना  सुरू  करण्यात  आलेली आहे. 1) लाभार्थी महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावे.२) वधू किंवा वर यांचे पैकी एक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,विमुक्त जाती – भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्ग असावे व दूसरा सवर्ण हिंदू,जैन, लिंगायत,बौध्द,शीख असावा.3 ) वधू किंवा वर यांचे पैकी कुणीही मुस्लीम, ख्रिश्चन नसावे.४) वधू किंवा वर यांचे पैकी कुणीही बाहेरच्या राज्यातील नसावे 5) विहित नमुन्यातील अर्ज,6) शासकीय कार्यालयात विवाह नोंद केल्याचे प्रमाणपत्र 7) वर-वधू यांचा एकत्रित फोटो.8) वर-वधू यांचा शाळा सोडल्याचा दाखला  9) वर/वधू यांचा सक्षम अधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र 10) दोघांचेही राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र 11) वर-वधू यांचे रहिवाशी प्रमाणपत्र ८) विहित नमुन्यात शपथपत्र ९) दोन प्रतिष्ठीत व्यक्तीची शिफारस पत्र 12) राष्ट्रीयकृत बँकेतील संयुक्त खाते. 13 ) रूपये  50,000/- अर्थसहाय्य  देण्यात येते.
    3 व्यसनमुक्ती प्रचार कार्य व्यसनाधिन लोकांना व्यसनमुक्त करणे व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थाना शासनाकडून प्राप्त होईल त्याप्रमाणे अनुदान दिले जाते.

    जिल्हा परिषद उपकर योजना

    1 दिव्यांग व्यक्तींना विनाअट घरकुल देण्याची योजना दिव्यांग व्यक्तींना निवा-याची व्यवस्था करणे. 1) 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे जिल्हा शल्यचिकित्सक /उपजिल्हा रुग्णालय यांचे वैदयकीय ऑनलाईन प्रमाणपत्र किंवा युडीआयडी कार्ड
    2) तहसिलदार यांनी दिलेला अधिवास / रहिवासी प्रमाणपत्र
    3) अर्जदाराने यापूर्वी या योजनेचा लाभ घेतला नसल्याचे ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र
    4) अर्जदार यांचे आधार कार्डची झेरॉक्स
    5) अर्जदार किंवा कुटुंबातील सदस्य शासकीय सेवत नसल्याचे प्रमाणपत्र
    6) जागेबाबत ग्रामपंचायत यांनी दिलेला 8 (अ) चा उतारा (स्वत:च्या नांवाचा)
    7) अर्जदार ग्रामीण भागातील रहिवासी असावा.
    8) तहसिलदार यांनी दिलेले वार्षीक उत्पन्न दाखला (1,00,000/- च्या आतील असणे आवश्यक आहे.
    2 निराधार/निराश्रीत व अतितीव्र दिव्यांग व्यक्तींना निर्वाह भत्ता देणे आर्थिक सहाय्य करणे 1) 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे जिल्हा शल्यचिकित्सक /उपजिल्हा रुग्णालय यांचे वैदयकीय ऑनलाईन प्रमाणपत्र किंवा युडीआयडी कार्ड
    2) तहसिलदार यांनी दिलेला अधिवास / रहिवासी प्रमाणपत्र
    3) अर्जदाराने यापूर्वी या योजनेचा लाभ घेतला नसल्याचे ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र
    4) अर्जदार यांचे आधार कार्डची झेरॉक्स
    5) अर्जदार किंवा कुटुंबातील सदस्य शासकीय सेवत नसल्याचे प्रमाणपत्र
    6) अर्जदार ग्रामीण भागातील रहिवासी असावा.
    7) तहसिलदार यांनी दिलेले वार्षीक उत्पन्न दाखला (1,00,000/- च्या आतील असणे आवश्यक आहे.)
    8) अर्जदार यांच्या बँके खात्यांची पासबुकची सत्यप्रत.
    3 अस्थिव्यंग व्यक्तीसाठी स्वयंचलित तीन चाकी सायकल/स्कुटर विथ ॲडाप्शन देण्याची योजना दिव्यांगांना मुक्त संचार करण्याकरीता तसेच पुनवर्सन करणे. 1) 40 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे जिल्हा शल्यचिकित्सक /उपजिल्हा रुग्णालय यांचे वैदयकीय ऑनलाईन प्रमाणपत्र किंवा युडीआयडी कार्ड
    2) स्कुटर विथ ॲडाप्शन चालविण्या ‍ करिता लाभार्थीकडे परिवहन अधिकारी यांचा परवाना /स्थायी ड्रायव्हींग अर्हक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे ( जिल्हा शल्यचिकित्सक यांचे)
    3) तहसिलदार यांनी दिलेला अधिवास / रहिवासी प्रमाणपत्र
    4) अर्जदाराने यापूर्वी या योजनेचा लाभ घेतला नसल्याचे ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र
    5) अर्जदार यांचे आधार कार्डची झेरॉक्स
    6) अर्जदार किंवा कुटुंबातील सदस्य शासकीय सेवत नसल्याचे प्रमाणपत्र
    7) अर्जदार ग्रामीण भागातील रहिवासी असावा.
    8) तहसिलदार यांनी दिलेले वार्षीक उत्पन्न दाखला (1,00,000/- च्या आतील असणे आवश्यक आहे.)
    9) अर्जदार यांच्या बँके खात्यांची पासबुकची सत्यप्रत.
    4 मागासवर्गीयांना संगणक / लॅपटॉप पुरविणे ग्रामिण भागातील मागासवर्गीयांना व्यवसायाची संधी देवून त्यांचे जीवनमान सुधारणे 1) अर्जदार हा अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,विमुक्त जाती व भटक्या जमाती,विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील असावा
    2) संगण योजनेचा अर्जदार 12 वी उत्तीर्ण व एम.एस.सी.आय.टी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्रधारक असावा.
    3) पिको फॉल शिलाई मशीन या योजनेकरिता महिला शिवणकाम करत असल्याचे ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र असावे.
    4)प्रत्येक योजनेकरिता उत्पन्न प्रमाणपत्र,जातीचे प्रमाणपत्र,तहसिल कार्यालयाचे असावे.
    5) ज्या योजनेकरिता विद्युत पुरवठा आवश्यक आहे त्याकरीता विद्युत पुरवठा असल्याचे ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र असावे.
    6) तसचे सदर योजनाबाबत शासन निर्णयामध्ये इतर योजनेंचाही उल्लेख केलेला आहे.
    5 मागासवर्गीयांना झेरॉक्स मशिन पुरविणे
    6 मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशिन पुरविणे
    7 मागासवर्गीयांना कडबा कुट्टी यंत्र पुरविणे
    8 मागासवर्गीय महिलांना पिको फॉल शिलाई मशिन पुरविणे
    9 मागासवर्गीयांना दुग्ध व्यवसायासाठी गाय / म्हैस पुरवठा करिता अर्थसहाय्य देणे
    10 मागासवर्गीयांना मिरची कांडप यंत्र पुरविणे
    11 मागासवर्गीयांना शेळी पालनासाठी शेळीचे गट पुरविणे
    दिव्यांग कल्याण आयुक्तालयस्तर योजना
    1 दिव्यांग व्यक्तीसाठी बीजभांडवल योजना दिव्यांग व्यक्तींना लघूद्दोगासाठी वित्तीय सहाय्य उपलब्ध करून देणे. निकष-
    १)वार्षिक उत्पन्न १.०० लाखापेक्षा कमी असावे.
    २) दिव्यांग व्यक्तीकडे किमान ४० % किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेले वैद्यकीय प्रमाणपत्र असावे.
    ३) वय १८ ते ५० वर्ष यामधील असावे.
    ४) महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
    लाभ – रुपये १.५० लाखा पर्यंत च्या व्यवसायासाठी ८० % बँक के मार्फत कर्ज व २० % अथवा कमाल रुपये ३०,०००/- सबसिडी स्वरुपात अर्थ सहाय्य दिले जाते.
    2 दिव्यांग-अव्यंग विवाह योजना अर्थसहाय्य करणे वधू अथवा वर दोन्ही पैकी एक व्यक्ती दिव्यांग व दुसरी व्यक्ती अव्यंग असल्यास, विवाह नंतर एक वर्षच्या आत अर्ज सादर केल्यास प्रती जोडपे रोख रक्कम 25000/- चे बचत पत्र,रुपये 20000/- रोख स्वरुपात, रुपये 4500/- संसार उपयोगी वस्तु खरेदी करण्यासाठी रुपये 500/- समारंभासाठी
    3 दिव्यांग व्यक्तीसाठी विविध साहित्य वाटप दिव्यांगाचे शारिरीक पुर्नवसन करणे.
    निकष
    निकष
    १) दिव्यांग व्यक्तीकडे किमान ४० % किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेले वैद्यकीय प्रमाणपत्र असावे.
    २) ) महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
    ३) उपकरणाची /साधनाची आवश्यकता असल्याचे तज्ञाचे शिफारस पत्र असावे.
    लाभ-अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींना तीन चाकी सायकल, कृत्रिम अवयव, कुबड्या, कलीपर्स, इत्यादी साधने तसेच अंध व्यक्तींना चष्मे, काठ्या, इयत्ता १० वी पुढील अंध व्यक्तींना शिक्षणासाठी टेपरेकॉर्डर, कर्णबधीरांसाठी वैयक्तिक श्रवणयंत्र इत्यादी साधनासाठी रुपये ३०००/- पर्यंत अर्थ सहाय्य उपलब्ध करून देणे.
    4 दिव्यांग विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना शालांत पूर्व शिष्यवृत्ती
    ही शिष्यवृत्ती इयत्ता १ ते १० वी शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना ऑनलाईन महा DBT पोर्टल अर्ज सादर करून दिली जाते.
    ही शिष्यवृत्ती इयत्ता १० वी नंतर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना ऑनलाईन महा DBT पोर्टल वर अर्ज सादर केल्यास दिली जाते.
    5 मतीमंद दिव्यांगाचे पालकत्व देणे मतीमंद दिव्यांगाचे पालन पोषण करणे. नॅशनल ट्रस्ट या केंद्रीय संस्थे कडे ऑनलाईन अर्ज करून व मा.जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षते खाली बैठक घेऊन या प्रमाणपत्राचे वितरण केले जाते.
    6 स्वंयमसेवी संस्थामार्फत दिव्यांगाना विशेष शिक्षण देणा-या अनुदानित शाळा/कार्यशाळा दिव्यांग विदयार्थ्याना शिक्षण देणे व पुनवर्सन करणे . विशेष शाळा यामध्ये 1 ते 7 वी पर्यत दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत निवासी शिक्षण दिले जाते. विशेष कार्यशाळा यामध्ये दिव्यांग 18 वर्षापुढील विद्यार्थ्यांना व्यावसायिक निवासी प्रशिक्षण दिले जाते. सदर अनुदानित शाळांना शासनामार्फत मा. आयुक्त, दिव्यांग कल्याण, पुणे यांच्याकडून विद्यार्थ्यांकरिता परिपोषण, इमारत भाडे, 8% वेतनेत्तर अनुदान व कर्मचारी यांचे वेतन देण्यात येते. विनाअनुदानित शाळा शासनामार्फत अनुदान देण्यात येत नाही.

    जिल्ह्यातील कार्यरत अनुदानित विशेष शाळा

    अ.क्र. शाळेचा प्रकार शाळांची संख्या विद्यार्थी संख्या
    1 अस्थिव्यंग 9 375
    2 मुकबधीर 8 355
    3 मतिमंद 7 420
    4 अंध 1 60

     

    जिल्ह्यातील कार्यरत अनुदानित विशेष शाळा
    अंध प्रवर्ग
    अ.
    क्र.
    संस्थेचे संपुर्ण नांव, पुर्ण पत्ता विशेष शाळा/कार्यशाळा मतीमंद बालगृहाचे  नांव व पत्ता एकूण मंजुर पदे मंजूर विद्यार्थी संख्या
    तारामती बाफना अंध कल्याण व संशोधन छत्रपती संभाजीनगर तारामती बाफना अंध विद्यालय, प्लॉट नं. एफ-23/2, एमआयडीसी, इंडस्ट्रीयल एरिया चिखलठाणा, छत्रपती संभाजीनगर. 19 60
    एकूण 19 60
    मुकबधीर प्रवर्ग
    अ.
    क्र.
    संस्थेचे संपुर्ण नांव, पुर्ण पत्ता विशेष शाळा/कार्यशाळा मतीमंद बालगृहाचे  नांव व पत्ता एकूण मंजुर पदे मंजूर विद्यार्थी संख्या
    कै. सोपानराव पाटील शि.प्र. मंडळ, छत्रपती संभाजीनगर मुकबधिर निवासी  विद्यालय, रसुलपुरा ता. खुलताबाद 24 65
    विदयासागर शि.प्र. मंडळ, नांदेड  इंदिरा निवासी मुकबधिर विद्यालय, नारेगांव जि. छत्रपती संभाजीनगर 16 75
    महावीर शिक्षण प्रसारक मंडळ जायकवाडी जा पैठण, जि औरंगाबाद  ओंकार मुकबधिर निवासी विदयालय, जायकवाडी, ता पैठण, जि औरंगाबाद 24 60
    शिवशारदा ग्राम विकास मंडळ, तांदुळवाडी ता.भूम जि. धाराशिव बाळकृष्ण निवासी मुकबधीर विदयालय, सिल्लोड, जि.छत्रपती संभाजीनगर 10 25
    ज्ञानप्रसारक शिक्षण संस्था, मांडणा ता. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर निवासी मुकबधीर विदयालय मांडणा  ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर 10 25
    लोकशिक्षण प्रसारक मंडळ, छत्रपती संभाजीनगर आनंद निवासी मुकबधिर विदयालय, गिरनेरा ता. जि छत्रपती संभाजीनगर 13 40
    गुरुप्रसाद बहुउददेशीय शिक्षण प्रसारक मंडळ, छत्रपती संभाजीनगर सावित्रीबाई फुले निवासी  मुकबधीर  विदयालय, हर्सूल छत्रपती संभाजीनगर 10 25
    अपंग जीवन विकास आणि संशोधन मंडळ, छत्रपती संभाजीनगर श्रृती वाणी विकास विदयालय (मुकबधीर) किरडपुरा, छत्रपती संभाजीनगर 8 40
    एकूण 115 355
    अस्थिव्यंग प्रवर्ग
    अ.
    क्र.
    संस्थेचे संपुर्ण नांव, पुर्ण पत्ता विशेष शाळा/कार्यशाळा मतीमंद बालगृहाचे  नांव व पत्ता एकूण मंजुर पदे मंजूर विद्यार्थी संख्या
    न्यु तुळजाभवानी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीकांतजी ठाकरे निवासी अपंग विद्यालय, फुलब्री,जि. औरंगाबाद पद मान्यता नाही. 25
    शिवशारदा ग्राम विकास मंडळ, तांदुळवाडी, ता भूम जि उस्मानाबाद संचलित  निवासी अपंग विद्यालय, फुलंब्री, ता फुलंबी, जि औंरगाबाद पद मान्यता नाही. 50
    लोक शिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर  नाथ निवासी अस्थिव्यंग विद्यालय, गिरनेरा ता.जि. छत्रपती संभाजीनगर 11 40
    गुरु प्रसाद बहुउददेशीय शिक्षण प्रसारक मंडळ, सिडको, जि औरंगाबाद संचलित   स्व. इंदिरा गांधी अस्थिव्यंग निवासी विदयालय, जातवाडा रोड, औरंगाबाद 8 25
    शिवशारदा ग्राम विकास मंडळ, तांदुळवाडी, ता भूम जि धाराशिव  निवासी अस्थिव्यंग विद्यालय, सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर 8 25
    महावीर शिक्षण संस्था, जायकवाडी, पैठण जि. छत्रपती संभाजीनगर  अपंग निवासी विद्यालय, जायकवाडी ता पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर 18 50
    जय मानव मुक्ती व आदिवासी विमुक्त भटके कृषी आणि ग्रामोद्योग विकास मंडळ,  छत्रपती संभाजीनगर  चैतन्य कानिफनाथ निवासी अपंग विद्यालय, नारेगाव, छत्रपती संभाजीनगर 19 50
    एकूण 64 265
    मतीमंद प्रवर्ग
    अ.
    क्र.
    संस्थेचे संपुर्ण नांव, पुर्ण पत्ता विशेष शाळा/कार्यशाळा मतीमंद बालगृहाचे  नांव व पत्ता एकूण मंजुर पदे मंजूर विद्यार्थी संख्या
    शिवशारदा ग्रामविकास मंडळ, तांदूळवाडी, ता. भूम, उस्मानाबाद  मतिमंद निवासी शाळा, मौजे भवन सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर 34 140
    नवजीवन सोसायटी  फॉर रिहॅबीलीटेशन ऑफ मेंटली रिटार्डड, छत्रपती संभाजीनगर नवजीवन मुलांची निवासी शाळा, एम आय डी सी, छत्रपती संभाजीनगर 15 40
    आशिशि आशादिप एज्युकेशन सोसायटी अमरावती आशा निकेतन  मतिमंद मुलांची विशेष शाळा पडेगांव औरंगाबाद 11 40
    इंदिरा महिला व बालविकास प्रतिष्ठान नांदेड इंदिरा मतिमंद निवासी विद्यालय, छत्रपती संभाजीनगर 26 50
    चैतन्य कानिफनाथ शिक्षण प्रसारक मंडळ, छत्रपती संभाजीनगर निवासी मतीमंद विद्यालय, गांधेली, छत्रपती संभाजीनगर 26 50
    चैतन्य कानिफनाथ शिक्षण प्रसारक मंडळ, छत्रपती संभाजीनगर निवासी मतीमंद विद्यालय, गोपाळपूर (मांडकी), छत्रपती संभाजीनगर 26 50
    एकूण 138 370
    सर्व प्रवर्ग एकूण संख्या 336 1050
    अ.क्र सेवाचा तपशिल जन माहिती अधिकारी नांव व पदनाम सेवा पुरविण्याची विहीत मुदत अपिलीय अधिकारी यांचे नांव व पदनाम द्वितीय अपिलीय अधिकारी यांचे पदनाम
    1 आस्थापना श्रीमती.आर. ए.चव्हाण,कार्यालय अधिक्षक 30 दिवस श्री.एस.डी.चव्हाण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मा.राज्य माहिती आयुक्त
    2 लेखा शाखा श्री.व्ही.व्ही.मामीलवाड, सहाय्यक लेखाधिकारी 30 दिवस श्री.एस.डी.चव्हाण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मा.राज्य माहिती आयुक्त
    3 मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती योजना श्री.ए.डब्लु.पिंपरकर, समाज कल्याण निरीक्षक 30 दिवस श्री.एस.डी.चव्हाण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मा.राज्य माहिती आयुक्त
    4 दिव्यांग शाळा व कार्यशाळा श्रीमती.के.जे.सोनकांबळे, समाज कल्याण निरीक्षक 30 दिवस श्री.एस.डी.चव्हाण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मा.राज्य माहिती आयुक्त
    5 दिव्यांगासाठी उपकर 5% योजना, अनुदानित वसतीगृह योजना श्री.व्ही.आर.डकले, विस्तार अधिकारी 30 दिवस श्री.एस.डी.चव्हाण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मा.राज्य माहिती आयुक्त
    6 अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील वस्तीचा विकास करणे श्री.बबन डी.आरसुळ, वरिष्ठ लिपीक 30 दिवस श्री.एस.डी.चव्हाण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मा.राज्य माहिती आयुक्त
    7 जिल्हा परिषद उपकर 20% योजना, आंतरजातीय विवाह योजना, दिव्यांग शिष्यवृत्ती, दिव्यांग-अव्यंग विवाह योजना, व्यसनमुक्ती प्रचार व प्रसिद्धी, मतिमंद मुलांचे पालकत्व योजना श्री.डी.एस.कवडे, कनिष्ठ लिपीक 30 दिवस श्री.एस.डी.चव्हाण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मा.राज्य माहिती आयुक्त
    8 आवक-जावक शाखा श्री.के.एम.मोरे, निदेशक 30 दिवस श्री.एस.डी.चव्हाण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मा.राज्य माहिती आयुक्त

     

    माहितीचा अधिकार १ ते १७ (समाज कल्याण विभाग )

     

    माहितीचा अधिकार १ ते १७
    अ. क्र. माहितीचे स्वरूप पहा (PDF)
    1 माहितीचा अधिकार १ ते १७ (समाज कल्याण विभाग) माहितीचा अधिकार १ ते १७ (समाज कल्याण विभाग) (पहा)

     

    महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015

    महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत अधिसुचित केलेल्या सेवा

    शासन निर्णय क्र.संकिर्ण 2017/ प्र.क्र.144/समन्वय/ दि.07 फेब्रुवारी,2018

    शासन शुद्धीपत्रक क्र.ईडीडी 2023/प्र.क्र.54/दि.क.-1 दि.18 ऑगस्ट,2023

    अ.क्र सेवाचा तपशिल सेवा पुरविणारे पदनिर्देशित अधिकारी पदनाम कालावधी प्रथम अपिलीय अधिकारी द्वितीय अपिलीय अधिकारी
    1 दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या कलम 49 मधील तरतुदीप्रमाणे दिव्यांग क्षेत्रात पुनर्वसन विषयक कार्य करण्यासाठी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र देणे. मा.आयुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे / जिल्हा समाज कल्याण अधिकारी (सादरकर्ता) 90 दिवस मा.सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई मा.मंत्री, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई
    2 अनुदानित दिव्यांगाच्या शाळा / कार्यशाळामधील रिक्त पदे भरण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना ना-हरकत प्रमाणपत्र देणे बाबत. मा.उप सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई 90 दिवस मा.सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई मा.मंत्री, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई

     

    नागरिकांची सनद (समाज कल्याण विभाग)

     

    नागरिकांची सनद
    अ. क्र. माहितीचे स्वरूप पहा (PDF)
    1 नागरिकांची सनद (समाज कल्याण विभाग ) नागरिकांची सनद (समाज कल्याण विभाग ) (पहा)

     

     

    विभागाचा संपर्क

     

    संपर्क
    अ. क्र. इ मेल संपर्क क्रमांक पत्ता
    1 dswozpaurangabad1@gmail.com 0240-… सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर