जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मार्फत घरकुलांसाठी राबविण्यात येणा-या योजना
प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण
1. लाभार्थी पात्रता निकष
- लाभार्थी हा बेघर असावा किंवा त्याच्याकडे पक्के घर नसावे.
- लाभार्थी कुटूंबाने यापुर्वी कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 1 लक्ष पेक्षा कमी असावे.
- दिव्यांग व्यक्ती असलेल्या कुटूंबाला प्राधान्याने लाभ देण्यात येतो.
2. लाभार्थीची निवड प्रक्रीया
- प्रपत्र ड यादी मध्ये समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांपैकी पात्र लाभार्थ्यांची निवड ग्रामसभे मार्फत केली जाते.
- पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी प्राप्त होणा-या उदिष्टाप्रमाणे प्राधान्यक्रमानुसार लाभ देण्यात येतो.
- एकुण उद्दिष्टांपैकी 5% घरकुले अपंग लाभार्थ्यांना देण्यात येतात.
3. लाभाचे स्वरुप
- साधारण क्षेत्र रु. 1,20,000/-
- प्रथम हप्ता – 15,000/- दुसरा हप्ता – 70,000/- तिसरा हप्ता – 30,000/- अंतिम हप्ता – 5,000/-
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत 90/95 मनुष्य दिवसाचे अकुशल अनुदान व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत रुपये 12000/- प्रोत्साहन अनुदान.
4. आवश्यक कागदपत्रे
- लाभार्थी कुटूंबाचे बेघर किंवा कच्चे घर असल्याचे प्रमाणपत्र.
- लाभार्थी कुटूंबाचे 1 लक्ष किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असल्याबाबतचे प्रमाणपत्र.
- रहिवासी प्रमाणपत्र.
- स्वत:च्या मालकीच्या जागेचा उतारा (नमुना नं. 8 किंवा 7/12).
- यापुर्वी कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र.
- मनरेगा जॉब कार्ड.
- स्वेच्छेने दिलेल्या आधार कार्ड ची प्रत.
- लाभार्थ्यांच्या स्वत:च्या नावे वापरात असलेल्या बॅक खात्याच्या पास बुक ची छायांकीत प्रत.
5. अर्ज कुठे करावा
ग्रामसभे मार्फत संबधित पंचायत समिती कडे अर्ज सादर करावा.
रमाई आवास योजना
1. लाभार्थी पात्रता निकष
- लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसुचित जाती व नवबौध्द संवर्गातील असावा.
- लाभार्थ्याचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्षांचे असावे.
- लाभार्थी हा बेघर असावा किंवा त्याच्याकडे पक्के घर नसावे.
- लाभार्थी कुटूंबाने यापुर्वी कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 1 लक्ष पेक्षा कमी असावे.
- दिव्यांग व्यक्ती असलेल्या कुटूंबाला प्राधान्याने लाभ देण्यात येतो.
2. लाभार्थीची निवड प्रक्रीया
- पात्र लाभार्थ्यांची निवड ग्रामसभे मार्फत केली जाते.
- ग्रामसभेव्दारे पात्र लाभार्थ्यांची यादी पंचायत समिती मार्फत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या कडे सादर केली जाते व मा. पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती मार्फत लाभार्थ्यांची निवड केली जाते.
- एकुण उद्दिष्टांपैकी 5% घरकुले अपंग लाभार्थ्यांना देण्यात येतात.
3. लाभाचे स्वरुप
- साधारण क्षेत्र रु. 1,20,000/-
- प्रथम हप्ता – 15,000/- दुसरा हप्ता – 45,000/- तिसरा हप्ता – 40,000/- अंतिम हप्ता – 20,000/-
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत 90/95 मनुष्य दिवसाचे अकुशल अनुदान व स्वच्छ भारत मिशन अंतर्गत रुपये 12000/- प्रोत्साहन अनुदान.
4. आवश्यक कागदपत्रे
- सक्षम प्राधीकाराने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षाकींत प्रत.
- लाभार्थी कुटूंबाचे बेघर किंवा कच्चे घर असल्याचे प्रमाणपत्र.
- लाभार्थी कुटूंबाचे 1 लक्ष किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असल्याबाबतचे प्रमाणपत्र.
- रहिवासी प्रमाणपत्र.
- स्वत:च्या मालकीच्या जागेचा उतारा (नमुना नं. 8 किंवा 7/12).
- यापुर्वी कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र.
- मनरेगा जॉब कार्ड.
- स्वेच्छेने दिलेल्या आधार कार्ड ची प्रत.
- लाभार्थ्यांच्या स्वत:च्या नावे वापरात असलेल्या बॅक खात्याच्या पास बुक ची छायांकीत प्रत.
5. अर्ज कुठे करावा
ग्रामसभेव्दारे पात्र लाभार्थ्यांची निवड करुन पंचायत समिती मार्फत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या कडे अर्ज सादर करावा.
शबरी आवास योजना
1. लाभार्थी पात्रता निकष :
- लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसुचित जमाती संवर्गातील असावा.
- लाभार्थ्याचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्षांचे असावे.
- लाभार्थी हा बेघर असावा किंवा त्याच्याकडे पक्के घर नसावे.
- लाभार्थी कुटूंबाने यापुर्वी कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 1 लक्ष पेक्षा कमी असावे.
- दिव्यांग व्यक्ती असलेल्या कुटूंबाला प्राधान्याने लाभ देण्यात येतो.
2. लाभार्थीची निवड प्रक्रीया :
- पात्र लाभार्थ्यांची निवड ग्रामसभे मार्फत केली जाते.
- ग्रामसभेव्दारे पात्र लाभार्थ्यांची यादी पंचायत समिती मार्फत प्रकल्प अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या कडे सादर केली जाते व मा. आयुक्त, एकात्मीक आदिवासी विकास विभाग यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती मार्फत लाभार्थ्यांची निवड केली जाते.
- एकुण उद्दिष्टांपैकी 5% घरकुले अपंग लाभार्थ्यांना देण्यात येतात.
3. लाभाचे स्वरुप :
- साधारण क्षेत्र रु. 1,20,000/-
- प्रथम हप्ता- 15,000/- दुसरा हप्ता- 45,000/- तिसरा हप्ता- 40,000/- अंतिम हप्ता – 20,000/-
- या शिवाय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत 90/95 मनुष्य दिवसाचे अकुशल अनुदान व पात्र लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत रुपये 12000/- प्रोत्साहन अनुदान देण्यात येते.
4. आवश्यक कागदपत्रे :
- सक्षम प्राधीकाराने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षाकींत प्रत.
- लाभार्थी कुटूंबाचे बेघर किंवा कच्चे घर असल्याचे प्रमाणपत्र.
- लाभार्थी कुटूंबाचे 1 लक्ष किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असल्याबाबतचे प्रमाणपत्र.
- रहिवासी प्रमाणपत्र.
- लाभार्थी कुटूंबाचे स्वत:च्या मालकीच्या जागेचा उतारा नमुना नं. 8 किंवा 7/12.
- लाभार्थी कुटूंबाने यापुर्वी कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र.
- मनरेगा जॉब कार्ड.
- आधार कार्ड – स्वेच्छेने दिलेल्या आधार कार्ड ची प्रत.
- लाभार्थ्यांच्या स्वत:च्या नावे वापरात असलेल्या बॅक खात्याच्या पास बुक ची छायांकीत प्रत.
5. अर्ज कुठे करावा :
- ग्रामसभेव्दारे पात्र लाभार्थ्यांची निवड करुन पंचायत समिती मार्फत प्रकल्प अधिकारी, एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प यांच्या कडे अर्ज सादर करावा.
मोदी आवास योजना
1. लाभार्थी पात्रता निकष :
- लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील इतर मागास प्रवर्गातील असावा.
- लाभार्थ्याचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्षांचे असावे.
- लाभार्थ्यांचे स्वत:च्या अथवा कुटूंबीयांच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे.
- लाभार्थ्यांकडे स्वत:ची अथवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे अथवा त्याचे स्वत:चे कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधता येईल.
- लाभार्थी कुटूंबाने महाराष्ट्र राज्यात अन्यत्र कुठेही शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण / गृहकर्ज योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
- एकदा लाभ घेतल्यानंतर लाभार्थी पुन:श्च योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार नाही.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 1.20 लक्ष पेक्षा कमी असावे.
2. लाभार्थीची निवड प्रक्रीया :
- खालील पैकी पात्र लाभार्थ्यांची निवड ग्रामसभे मार्फत केली जाते.
- आवास प्लस मधील प्रतिक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी.
- आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु Automatic System व्दारे Reject झालेले पात्र लाभार्थी.
- जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थी.
- ग्रामसभेव्दारे पात्र लाभार्थ्यांची यादी पंचायत समिती कडे सादर केली जाते.
- ग्रामसभेव्दारे निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची पंचायत समिती व्दारे स्थळ पाहणी केली जाते.
- पंचायत समिती मार्फत छानणी केलेल्यांपैकी पात्र लाभार्थ्यांची यादी जिल्हास्तरीय समितीकडे अंतिम मंजुरी साठी पाठविण्यात येते.
- एकुण उद्दिष्टांपैकी 5% घरकुले अपंग लाभार्थ्यांना देण्यात येतात.
3. लाभाचे स्वरुप :
- साधारण क्षेत्र रु. 1,20,000/-
- प्रथम हप्ता – 15,000/- दुसरा हप्ता – 45,000/- तिसरा हप्ता – 40,000/- अंतिम हप्ता – 20,000/-
- या शिवाय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत 90/95 मनुष्य दिवसाचे अकुशल अनुदान व पात्र लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत रुपये 12000/- प्रोत्साहन अनुदान देण्यात येते.
4. आवश्यक कागदपत्रे :
- लाभार्थी कुटूंबाचे स्वत:च्या मालकीच्या जागेचा उतारा नमुना नं. 8 किंवा 7/12
- सक्षम प्राधीकाराने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षाकींत प्रत.
- मनरेगा जॉब कार्ड
- आधार कार्ड – स्वेच्छेने दिलेल्या आधार कार्ड ची प्रत.
- लाभार्थ्यांच्या स्वत:च्या नावे वापरात असलेल्या बॅक खात्याच्या पास बुक ची छायांकीत प्रत.
- लाभार्थी कुटूंबाचे बेघर किंवा कच्चे घर असल्याचे प्रमाणपत्र.
- लाभार्थी कुटूंबाचे 1.20 लक्ष किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असल्याबाबतचे प्रमाणपत्र.
- रहिवासी प्रमाणपत्र.
- लाभार्थी कुटूंबाने यापुर्वी कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र.
5. अर्ज कुठे करावा :
- ग्रामसभेव्दारे पात्र लाभार्थ्यांची निवड करुन पंचायत समिती मार्फत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या कडे अर्ज सादर करावा.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना
1. लाभार्थी पात्रता निकष :
- लाभार्थी कुटूंब हे विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या सर्व प्रवर्गासाठी लागू आहे.
- सदरील योजना सामूहिकरीत्या प्रकल्पासाठी तसेच वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी लागू आहे.
- लाभार्थ्याचे महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा.
- लाभार्थी बेघर अथवा झोपडी / कच्चे घर/ पालामध्ये राहणारा असावा/असावेत.
- लाभार्थ्यांचे स्वत:च्या अथवा कुटूंबीयांच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे.
- लाभार्थी कुटुंबाने महाराष्ट्र राज्यात अन्यत्र कुठेही शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण / गृहकर्ज योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
- लाभार्थी वर्षभरात 6 महिने एका ठिकाणी वास्तव्यास असावा.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 1.20 लक्ष पेक्षा कमी असावे.
2. लाभार्थीची निवड प्रक्रिया :
- पात्र लाभार्थ्यांची निवड ग्रामसभे मार्फत केली जाते.
- ग्रामसभेव्दारे पात्र लाभार्थ्यांची निवड करुन पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव पंचायत समिती मार्फत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या कडे सादर केले जातात.
- मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती मार्फत शासनास मंजुरी साठी प्रस्ताव सादर करण्यात येतो.
3. लाभाचे स्वरूप :
- साधारण क्षेत्र रु. 1,20,000/-
- प्रथम हप्ता- 15,000/-
- दुसरा हप्ता- 45,000/-
- तिसरा हप्ता- 40,000/-
- अंतिम हप्ता – 20,000/-
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत 90/95 मनुष्य दिवसाचे अकुशल अनुदान व पात्र लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत रुपये 12000/- प्रोत्साहन अनुदान देण्यात येते.
4. आवश्यक कागदपत्रे :
- लाभार्थी कुटूंबाचे स्वत:च्या मालकीच्या जागेचा उतारा नमुना नं. 8 किंवा 7/12
- सक्षम प्राधीकाराने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षाकींत प्रत.
- मनरेगा जॉब कार्ड
- आधार कार्ड – स्वेच्छेने दिलेल्या आधार कार्ड ची प्रत.
- लाभार्थ्यांच्या स्वत:च्या नावे वापरात असलेल्या बॅक खात्याच्या पास बुक ची छायांकीत प्रत.
- लाभार्थी कुटूंबाचे बेघर किंवा कच्चे घर असल्याचे प्रमाणपत्र.
- लाभार्थी कुटूंबाचे 1.20 लक्ष किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असल्याबाबतचे प्रमाणपत्र.
- रहिवासी प्रमाणपत्र.
- लाभार्थी कुटूंबाने यापूर्वी कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ न घेतल्याबाबत 100 रुपये च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र.
5. अर्ज कुठे करावा :
ग्रामसभेव्दारे पात्र लाभार्थ्यांची निवड करुन पंचायत समिती मार्फत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या कडे अर्ज सादर करावा.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना
1. लाभार्थी पात्रता निकष :
- लाभार्थी कुटूंब हे भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या लोकांसाठी लागू आहे.
- सदरील योजना वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी लागू आहे.
- लाभार्थ्याचे महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असावा.
- लाभार्थी बेघर अथवा झोपडी / कच्चे घर/ पालामध्ये राहणारा असावा.
- लाभार्थ्यांचे स्वत:च्या अथवा कुटूंबीयांच्या मालकीचे राज्यात पक्के घर नसावे.
- लाभार्थी कुटुंबाने महाराष्ट्र राज्यात अन्यत्र कुठेही शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण / गृहकर्ज योजनांचा लाभ घेतलेला नसावा.
- लाभार्थी वर्षभरात 6 महिने एका ठिकाणी वास्तव्यास असावा.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 1.20 लक्ष पेक्षा कमी असावे.
2. लाभार्थीची निवड प्रक्रिया :
- पात्र लाभार्थ्यांची निवड ग्रामसभे मार्फत केली जाते.
- ग्रामसभेव्दारे पात्र लाभार्थ्यांची निवड करुन पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव पंचायत समिती मार्फत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या कडे सादर केले जातात.
- मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती मार्फत प्रशासकीय मान्यता देवून निधी वितरणासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्यात येतो.
3. लाभाचे स्वरूप :
- साधारण क्षेत्र रु. 1,20,000/-
- प्रथम हप्ता- 15,000/-
- दुसरा हप्ता- 45,000/-
- तिसरा हप्ता- 40,000/-
- अंतिम हप्ता – 20,000/-
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत 90/95 मनुष्य दिवसाचे अकुशल अनुदान व पात्र लाभार्थ्यांना स्वच्छ भारत मिशन अंतर्गत रुपये 12000/- प्रोत्साहन अनुदान देण्यात येते.
4. आवश्यक कागदपत्रे :
- लाभार्थी कुटूंबाचे स्वत:च्या मालकीच्या जागेचा उतारा नमुना नं. 8 किंवा 7/12
- सक्षम प्राधीकाराने दिलेल्या जातीच्या प्रमाणपत्राची साक्षाकींत प्रत.
- मनरेगा जॉब कार्ड
- आधार कार्ड – स्वेच्छेने दिलेल्या आधार कार्ड ची प्रत.
- लाभार्थ्यांच्या स्वत:च्या नावे वापरात असलेल्या बॅक खात्याच्या पास बुक ची छायांकीत प्रत.
- लाभार्थी कुटूंबाचे बेघर किंवा कच्चे घर असल्याचे प्रमाणपत्र.
- लाभार्थी कुटूंबाचे 1.20 लक्ष किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असल्याबाबतचे प्रमाणपत्र.
- रहिवासी प्रमाणपत्र.
- लाभार्थी कुटूंबाने यापूर्वी कुठल्याही घरकुल योजनेचा लाभ न घेतल्याबाबत 100 रुपये च्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र.
5. अर्ज कुठे करावा :
ग्रामसभेव्दारे पात्र लाभार्थ्यांची निवड करुन पंचायत समिती मार्फत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग यांच्या कडे अर्ज सादर करावा.
पंडित दिनदयाल उपाध्याय जागा खरेदी अर्थसहाय योजना
1. लाभार्थी पात्रता निकष :
- केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजने अंतर्गत मंजूर असलेल्या ज्या लाभार्थ्यांकडे घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही असे लाभार्थी.
- सदरील योजना वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी लागू आहे.
2. लाभार्थीची निवड प्रक्रिया :
- लाभार्थ्याने जागेची निवड केल्यानंतर जागा हस्तांतरण योग्य व जागेची किंमत याची शहानिशा तालुकास्तरीय समिती मार्फत केली जाते.
- लाभार्थी जागा मालका बरोबर विक्री करार (Agreement To Sale) करेल.
- जागेसाठी देय निधी लाभार्थ्यांच्या बॅंक / पोस्ट खात्यामध्ये जमा करण्यापूर्वी लाभार्थ्यांकडून प्रतिज्ञापत्र प्राप्त करून घेण्यात येते.
- वरील बाबींची पूर्तता झाल्यावर जागेचा देय निधी लाभार्थ्यांच्या बॅंक / पोस्ट खात्यात जमा करण्यात येतो.
- तालुकास्तरीय समिती जागेची प्रत्यक्ष खरेदी करतांना समन्वय करते.
- लाभार्थ्यामार्फत जागेची किंमत जागा मालकास अदा केली जाते व प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया (Sale Deed) पार पडते.
- खरेदी नंतर लाभार्थ्यांच्या नावे सदर जागेची नोंद ग्रामपंचायत, City Survey व इतर सक्षम प्राधिकरणाकडे तालुकास्तरीय समिती मार्फत केली जाते.
- जागेची नोंद प्राधान्याने लाभार्थ्याच्या पत्नीच्या नावे किंवा संयुक्त नावाने घेण्यात येते.
- जागा खरेदीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ग्रामसभेपुढे अवलोकनार्थ ठेवण्यात येते.
3. लाभाचे स्वरूप :
- केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजने अंतर्गत घरकुल पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना 25 चौ.मी. (500 चौ.फुटा पर्यंत) जागा खरेदी करण्यासाठी 1,00,000/- रुपये पर्यंत अनुदान देण्यात येते.
4. आवश्यक कागदपत्रे :
- घरकुल बांधण्यासाठी स्वत:ची जागा उपलब्ध नसल्याबाबतचे प्रमाणपत्र व शपथपत्र.
- लाभार्थ्याचा जागा मालकाबरोबर विक्री करार (Agreement To Sale).
5. अर्ज कुठे करावा :
ग्रामपंचायत मार्फत पंचायत समिती कार्यालयाकडे अर्ज सादर करावा.