बेटी बचाओ- बेटी पढाओ
दिनांक २२ जानेवारी २०१५ रोजी पानिपत, हरियाना येथून सदर योजनेचा प्रारंभ करण्यात आला.
योजनेचा उद्देश:
- मुलींच्या जन्माचे प्रमाण वाढविणे.
- स्त्री भ्रूणहत्या रोखणे.
- मुलींना खात्रीचे शिक्षण.
- मुलींच्या जन्माची सुरक्षितता.
- लिंग समानता.
बेबी केअर किट
बेबी केअर किट योजने अंतर्गत प्रसुतीच्या पहिल्या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा शासकीय रूग्णालयात नाव नोंदणी केलेल्या गरोदर मातेला बेबी केअर किट उपलब्ध करून देण्यात येते. प्रसुती झाल्यावर तीने दोन महिन्याच्या आत बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचे कार्यालयास अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
माझी लाडकी बहीण योजना
महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला यांना लाभ देण्यात येतो. ०१ जुलै २०२४ पासून दरमहा रु.१५००/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.
लेक लाडकी योजना
1 एप्रिल 2023 नंतर जन्म झालेल्या मुलींना सदर योजनेचा लाभ देण्यात येतो. रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न 1 लाखाच्या आत, लाभार्थी आधार कार्ड, आईचे आधार कार्ड, संयुक्त बँक खाते आवश्यक आहे.
योजनांची माहिती
अ.क्र |
विभागाचे नाव |
योजनेचे नाव |
मिळणारे लाभ |
लागणारी कागदपत्रे |
1 |
महिला व बाल विकास विभाग |
ग्रामीण व दुर्गम भागातील इयत्ता 5 वी ते 12 वीत शिकणाऱ्या मुलींना 100 टक्के अनुदानावर सायकल पुरविणे (DBT व्दारे) |
सायकल |
1. ग्रामीण भागातील रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र
2. वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (1,20,000/- च्या आत)
3. शाळेचे अंतर प्रमाणपत्र (किमान 2 कि.मी.)
4. शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र (TC)
5. लाभार्थी स्वंयघोषणा प्रमाणपत्र
6. बँक पासबुकची सत्यप्रत |
2 |
|
MS-CIT प्रशिक्षण योजना |
संगणक प्रशिक्षण |
1. ग्रामीण भागातील रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र
2. वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (1,20,000/- च्या आत)
3. MS-CIT मान्यता प्राप्त प्रमाणपत्र
4. शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र (TC)
5. लाभार्थी स्वंयघोषणा प्रमाणपत्र
6. जातीचे प्रमाणपत्र किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र |
3 |
|
इंग्रजी टायपिंग (Data Entry) व Tally प्रशिक्षण योजना |
संगणक प्रशिक्षण |
1. ग्रामीण भागातील रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र
2. वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (1,20,000/- च्या आत)
3. इंग्रजी टायपिंग (Data Entry) व Tally प्रमाणपत्र
4. शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र (TC)
5. लाभार्थी स्वंयघोषणा प्रमाणपत्र
6. जातीचे प्रमाणपत्र किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र |
4 |
महिला व बाल विकास विभाग |
हवाई सुदंरी (एअर होस्टेस) प्रशिक्षण व अनुषंगीक अभ्यासक्रमासाठी आर्थिक सहाय्य योजना |
एअर होस्टेस प्रशिक्षण |
1. ग्रामीण भागातील रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र
2. वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (1,20,000/- च्या आत)
3. शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र (TC)
4. लाभार्थी स्वंयघोषणा प्रमाणपत्र
5. बँक पासबुकची सत्यप्रत |