प्रस्तावना
बांधकाम विभागाकडून ग्रामीण भागातील जनतेचे जीवन सुलभ होण्यासाठी व जीवनमान उंचावण्यासाठी विकास कामे केली जातात. त्यामध्ये प्रामुख्याने रस्त्याची बांधकाम व रस्ता दुरुस्तीचे कामे करून दळणवळणासाठी सोय करण्यात येते, तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य व्यवस्थित राहण्याकरिता आरोग्य विभागाकडील बांधकाम व दुरुस्तीचे कामे करण्यात येतात, तसेच इतर महत्वाचे विभागाचे जसे शिक्षण विभाग, महिला व बालकल्याण विभाग, पशुधन विकास इ. विभागाचे बांधकामे व दुरुस्ती करून सदरील विभागाचे उद्दिष्ठ पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्यात येते.
जिल्ह्यात एकूण ग्रामीण रस्त्याची लांबी 4978.75 कि.मी. असून इतर जिल्हा मार्गाची लांबी 1676.85 कि.मी. आहे. सदरील ग्रामीण व इतर जिल्हा मार्ग रस्त्याची बांधकामे व त्यासोबत दुरुस्तीचे कामे पूर्ण करून रस्ते वाहतुकी योग्य ठेवण्यात येतात.
तालुका | इतर जिल्हा मार्ग | ग्रामीण मार्ग | एकूण |
छत्रपती संभाजीनगर | 162.55 | 815.31 | 977.86 |
पैठण | 246.80 | 864.54 | 1111.34 |
फुलंब्री | 153.90 | 496.50 | 650.40 |
सिल्लोड | 320.40 | 418.20 | 738.60 |
सोयगांव | 78.00 | 290.00 | 368.00 |
कन्नड | 143.50 | 748.48 | 891.98 |
खुलताबाद | 113.40 | 223.16 | 336.56 |
वैजापूर | 264.00 | 603.36 | 867.36 |
गंगापूर | 194.30 | 519.20 | 713.50 |
एकूण | 1676.85 KM | 4978.75 KM. | 6655.60 KM. |
ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजने अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील देवस्थानांच्या ठिकाणी भाविकांसाठी सोयी सुविधा पुरविल्या जातात,ज्यामध्ये भक्तनिवास बांधकाम,स्वच्छतागृह बांधकाम,पाणी पुरवठा व्यवस्था करणे, परिसर विकास करणे, पोहोच रस्ता करणे, संरक्षण भिंत बांधकाम करणे इ. कामे करण्यात येतात.
क’ वर्ग दर्जा तीर्थक्षेत्रासाठी रु ६०.०० लक्ष किमतीपर्यंत व ‘ब’ वर्ग दर्जा तीर्थक्षेत्रासाठी रु. ५.०० कोटी निधी मर्यादेपर्यंत कामे मंजूर करण्यात येतात, देवस्थानास जिल्हा नियोजन समितीकडून ‘क’ वर्ग व शासन स्तरावर ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्यात येतो. जिल्ह्यात एकूण ‘क’ वर्ग दर्जा २४१ व ‘ब’ वर्ग दर्जा १२ तीर्थक्षेत्र आहेत.