प्रस्तावना
छत्रपती संभाजीनगर या शहराला एैतिहासिक व भौगोलिक महत्व आहे. त्याची स्थापना सन 1610 मध्ये झालेली असून, त्याचे भौगोलिक स्थान मध्य महाराष्ट्रात 19 व 20 अंश उत्तर अक्षांश आणि 74 व 75 अंश पुर्व रेखांशामध्ये. भौगोलिक क्षेत्रफळ :- 10,000 चौ.कि.मी.( 10,07,730 हे.) महाराष्ट्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या 3.28 % जिल्हयामध्ये प्रमुख नदी तसेच दक्षिणेतील गंगा म्हणून प्रसिध्द असलेली पैठण तालुक्यामध्ये गोदावरी नदी जिल्हयाच्या दक्षिण भागामधून पश्चिम-पुर्व या दिशेने वाटचाल करत जाते. त्या नदीवर जगप्रसिध्द असे जायकवाडी जलसिंचन प्रकल्प बांधलेला असून, त्यास नाथसागर असे नाव असून नाथसागराच्या पायथ्याशी संतज्ञानेश्वर उद्यान प्रसिध्द आहे. छत्रपती संभाजीनगर हे शहर महाराष्ट्राच्या मध्यवर्ती आणि महत्वाचे तसेच राज्याची पर्यटन राजधानी म्हणून ओळखले जाते. जिल्हयामध्ये एकूण (9) तालुके असून, खुलताबाद तालुक्यामध्ये वेरुळ येथे जगप्रसिध्द कैलास लेणी तसेच सिल्लोड तालुक्यामध्ये अजिंठा येथे जगप्रिसिध्द बौध्द लेणी प्रसिध्द आहे. शहरामध्ये जगामधील सात आश्चर्यापैकी एक असेलेले आग्रा येथील ताजमहालाचे दुसरे प्रतिबिंब बिबीका मकबरा म्हणून प्रसिध्द आहे. येथे पवन चक्की असून, ते एक औद्योगिक शहर म्हणून पुढे येत आहे.
आपला देश हा कृषी प्रधान देश असून, शेतीव्यवसाय मोठया प्रमाणात चालतो व आलीकडे शेतीला पुरक व्यवसाय म्हणून पशुसंवर्धनाकडे पाहिले जाते. राज्यामध्ये पशुसंवर्धन विभागाअंतर्गत विविध योजना राबविल्या जातात. जिल्हा स्तरावर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जि.प. छत्रपती संभाजीनगर हे विभागाचे प्रमुख असून, निरनिराळया योजनेचे ते अंमलबजावणी अधिकारी असून केंद्रस्तर व राज्यस्तर तसेच जिल्हा परिषद उपरकरामधून राबविण्यात येणाऱ्या योजनांची अंमलबजावणी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी व मा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करतात
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेअंतर्गत श्रे-1 व श्रे-2 चे (84) पशुवैद्यकिय दवाखाने कार्यरत असून, श्रे-1 चे (38) व श्रे- 2 ची (46) पशुवैद्यकिय दवाखाने कार्यरत आहे. पशुवैद्यकिय दवाखाने श्रे-1 व श्रे-2 यांच्या द्वारे विविध प्रकारची कृत्रिम रेतन, औषधोपचार, लसीकरण, खच्चीकरण, गर्भतपासणी, वंध्यत्व तपासणी, संकरित वासरांची पैदास, नमूने तपासणी, शस्त्रक्रिया इत्यादी स्वरुपाचे तांत्रिक कामकाज व शासकिय योजना राबविण्याचे कार्य केले जाते.
छत्रपती संभाजीनगर जिल्हयामध्ये सन 2017 च्या 20 व्या पशुगणनेनुसार लहान मोठी जनावरांची संख्या- 633002 व शेळया व मेंढयांची एकूण संख्या 519426 इतकी आहे.
गट पातळीवर पशुधन विकास अधिकारी (वि) हे समन्वयक अधिकारी म्हणून शासनस्तर व जिल्हा परिषद स्तरावरील निरनिराळया योजना राबविण्याच्या दृष्टिने पंचायत समिती त्या अंतर्गत असणारे दवाखान्याद्वारे गट विकास अधिकारी यांच्या वतीने योजना राबवितात.