बंद

कृषी विभाग

प्रस्तावना

भारत हा कृषिप्रधान देश असून कृषी हा अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ मानला जातो. देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात शेती क्षेत्राचा वाटा १८.२% आहे. भौमितिक पद्धतीने वाढणारी देशाची लोकसंख्या पाहता कृषी उत्पन्नामध्ये वाढ होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा जसे खते, बियाणे, कीटकनाशके योग्य व माफक दरात वेळेवर मिळावीत, कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञांनाबद्दल शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणे, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना सिंचन विहीर व अनुषंगिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसहाय्य करणे ही उद्दिष्ट ठेवून बहुजन हिताय बहुजन सुखाय या उक्तीप्रमाणे कृषी विभाग जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर कार्यरत आहे.

कृषी विषयक सर्वसाधारण माहिती

घटक माहिती
जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र 10,07,730 हेक्टर
एकूण पेरणी योग्य क्षेत्र 8,14,000 हे.
सरासरी खरीप क्षेत्र 6,84,000 हे.
सरासरी रब्बी क्षेत्र 1,90,935 हे.
सरासरी पर्जन्यमान 636.99 मि.मी.
जिल्ह्यातील एकूण गावे 1372

खरीप 2024

अ.क्र. पिकाचे नाव क्षेत्र (हे)
1 खरीप ज्वारी 273
2 बाजरी 13003
3 मका 206075
4 इतर तृणधान्य 968
एकूण तृणधान्य 220319
1 तूर 36144
2 मूग 11710
3 उडिद 3361
4 इतर कडधान्य 626
एकूण कडधान्य 51841
1 भुईमूग 5713
2 तीळ 239
3 सूर्यफूल 71
4 सोयाबीन 33715
5 इतर गळीतधान्य 627
एकूण गळीतधान्य 40365
1 कापूस 362421
एकूण क्षेत्र 674945

रब्बी 2024-25

अ.क्र. पिकाचे नाव क्षेत्र (हे)
1 रब्बी ज्वारी 32808
2 गहू 112686
3 मका 55099
4 इतर तृणधान्य 12116
एकूण तृणधान्य 201809
1 हरभरा 71055
2 इतर कडधान्य 89
एकूण कडधान्य 71144
एकूण अन्नधान्य 272952
1 करडई 94
2 जवस 32
3 तीळ 10
4 सूर्यफूल 280
5 इतर गळीतधान्य 189
एकूण गळीतधान्य 605
एकूण रब्बी पिकाखालील क्षेत्र 273556